कुंभमेळा ही बौद्धांची परंपरा आहे !

बौद्धमय भारत

हेनसांग हा विदेशी प्रवासी बुद्धाच्या शोधात भारतामध्ये ई.स. 629 ते 645 असे एकूण 16 वर्ष त्याने भारतातील परिस्थितीचा अभ्यास केला. तो जेंव्हा कान्यकुब्ज ( कन्नोज) येथे आला. (कनौज खूप दिवस पर्यंत उत्तर भारताची राजधानी राहिलेली आहे.) त्यावेळी हर्षवर्धन राजा राज्य करीत होता. हा राजा बुद्धिस्ट असून शिलादित्य हर्षवर्धन नावाने प्रसिद्ध होता. त्याने संपूर्ण भारतात आदेश काढला की, कोणीही जीव हिंसा आणि मांसभाक्षण करणार नाही. या नियमाचे उल्लंघन केल्यास मृत्युदंडाची शिक्षा निश्चित केली. या राजाने गंगा नदीच्या काठावर शंभर फूट उंचीचे, हजारो स्तूप बांधले.

या स्तूपामध्ये खाण्यापिण्याची सर्व प्रकारची साहित्य सामग्री उपलब्ध राहत असे, आणि वैद्य लोक औषधी सहित नेहमी तयार राहात असे जेणेकरून यात्रे करू आणि जवळपासच्या सर्व दुःखी – दरिद्री लोकांचा इलाज कोणताही अडथळा न येता केल्या जायचा. जिथे जिथे भगवान बुद्ध यांचे चिन्ह होते तेथे संघाराम ( बुद्ध विहार) उभारण्यात आले. दर 5 वर्षांनी ‘ विमुक्ती ‘ (कुंभ मेळा) नावाचा खूप मोठा मेळा आयोजित केल्या जात होता. या मेळा मध्ये राजा सैन्याचे शस्त्र सोडून आपला खजाना दान म्हणून लोकांना देत होता. कारण शस्त्र हे भिकूंच्या कोणत्याही उपयोगाचे नव्हते. प्रत्येक वर्षी राज्यातील सर्व श्रमनांना एकत्रित करून तिसऱ्या किंवा सातव्या दिवशी सर्वांना चार प्रकारच्या वस्तू (अन्न,पाणी, औषधी, वस्त्र) दान करीत होता. त्याने कित्येक धम्म सिंहासनांना सोन्याने मढवून टाकले होते. ज्या व्यासपीठावरून (उपदेशासन, धम्मासन) धम्मदेशना दिल्या जात असे त्या व्यासपीठाला त्याने मौल्यवान रत्नांनी सुशोभित केले होते.

त्याने भिक्खूंना वादविवाद (Debate) करण्याची आज्ञा देऊन ठेवलेली होती. तो भिक्खूंचा खूप आदर करायचा आणि दृष्ट लोकांना दंड देण्यात कुठलीही कसर सोडत नव्हता. यावरून स्पष्ट होते की हा राजा बौद्ध धर्माचे पालन करणारा होता सोबतच इतर धर्माची रक्षा आणि आदर करणारा होता. वरील प्रसंगावरून हे सुद्धा सिद्ध होते की कुंभमेळा हा बुद्धिस्ट लोकांच्या एक परंपरेचा भाग होता. हीच गोष्ट अकराव्या शतकात अलबरुनी भारतात आला होता त्याने सुद्धा आपल्या नोट्समध्ये बुद्धिस्टांच्या या कुंभमेळ्याचे वर्णन केलेले आहे. आज कुंभमेळ्याचे ब्राह्मणीकरण करून आयोजन केल्या जात आहे, म्हणून त्याचे स्वरूप आज पूर्ण बदललेले. बुद्धिस्टांच्या प्रत्येक परंपरेवर ब्राह्मणवाद्यांनी कब्जा केलेला आहे. या देशात ब्राह्मणांचे स्वतःच्या मालकीचे असे काहीही नाही. त्यांचा हा खोटारडेपणा उघडा पडू नये म्हणून ते आपल्याला सांगतात की,ही परंपरा आम्ही गेल्या हजारो वर्षापासून पाळत आलेलो आहोत. कुंभमेळ्याची परंपरा अस्तित्वात जरूर होती पण ती बुद्धिस्टांची होती.

(संदर्भ: बुद्ध की तलाश में चिनी बौद्ध – यात्री हेनसांग की भारत यात्रा, लेखक हेनसांग, अनुवाद ठाकूर प्रसाद शर्मा, संपादक शांतीस्वरूप बौद्ध, प्राकथन डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह, पाचवा अध्याय, पृष्ठ क्रमांक170 ते 184)

प्रा. गंगाधर नाखले
दि. 07/03/2024
मो.9764688712, 7972722081

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *