आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर ( भाग २ )

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
                                                     चर्चेचे गांभीर्य
२००४-२००५ यावर्षी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत जे मला बघायला मिळाले, जे मी अनुभवले; त्यावरून आंबेडकरी चळवळ या देशात फार काळ चालेल असे दिसत नाही. ती जी काही चालेल ती माझ्या’पिढी ती माझ्या पिढी पुरतीच. त्यातलेसुद्धा कमिटेड कार्यकर्ते -त्यातले सुद्धा कमिटेड कार्यकर्ते असेपर्यंत, तेवढ्यापुरतीच राहिल. पुढे ती चालली तर्‌॒ त्यामध्ये आंबेडकरी विचार आणि स्वाभिमान नसेल. विचाराला मानणारा कार्यकर्ता नसेल, जो काही कार्यकर्ता आढळेल त्याची चळवळीशी आणि विचाराशी बांधिलकी किती राहील, याबद्दल मला शंका आहे. त्याची बांधिलकी जर चळवळीशी नसेल तर चळवळ कशी आणि कुठे राहणार आहे? हे मी लिहीत असताना, काही जणांना निवडणुकीच्या अपयशातून, मी निराशावादी झालोय आणि म्हणून अशी भूमिका मांडतोय, असे वाटण्याची शक्यता आहे. त्या सवींना मी सांगू इच्छितो की, माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा आंबेडकरी चळवळीत झोकून देतो; तेव्हा त्याला ही जाणीव असतेच की, आपल्याला सहजासहजी सत्ता मिळणार नाही. सत्तेसंबंधी त्याची भूमिका असते की, सत्ता मिळाली तर ठीक. अन्यथा जे काही अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले व जी एक व्यवस्था निर्माण केली, त्या अधिकारात वाढ कशी होईल त्याचबरोबर जी व्यवस्था निर्माण केली आहे, ती सुदृढ कशी होईल,- यासाठी धडपड करीत रहावे. त्यामुळे चळवळीसंबंधीची जी काही चर्चा मी येथे करत आहे; ती पूर्वग्रह न ठेवता गांभीर्याने लक्षात घेतली जावी अशी, माझी अपेक्षा आहे. आंबेडकरी चळवळीत काम करताना याची जाणीव ठेवणे महत्वाचं आहे की, आपले आर्थिक, सामाजिक उद्दिष्ट आणि तत्वज्ञान हे असमानतेच्या विरोधात असल्यामुळे, त्याला प्रस्थापितांकडून विरोध हा होणारच. त्या विरोधाची धार वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळी असते, सत्ता मिळविणे हे प्रवाहाच्या विरोधात पोहण्यासारखे कठीण असते. चळवळीची ही अवस्था का झाली? त्याची कारणे काय? काय मिळविले? काय गमविले? काय मिळवून टिकवू शकलो नाही?- याचेही थोडक्यात इथे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणाची सुरूवात नामांतराच्या चळवळीपासून करीत आहे.
                                                     नामांतर
१९८० साली माझ्या राजकीय चळवळीला सुरूवात झाली. त्यावेळची महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी होती. १९७६ साली, सुरू झालेली नामांतराची चळवळ क्षीण होण्याच्या मार्गावर होती. आंबेडकरी चळवळ पूर्णपणे “नामांतर ‘
या एकाच प्रश्नावर केंद्रित झालेली होती. नामांतराच्या लढ्यात लोकांनी एकजूट दाखविली ही ताकद खूप मोठी होती. त्यामध्ये चळवळीबरोबर नसणारे पण बाबासाहेबांना मानणारे हेही सहभागी होते. ही उभी राहीलेली चळवळ नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान काँग्रेसने व त्याचबरोबर काँग्रेसबरोबर समझोत्यात असलेल्या आर पी आयच्या नेत्यांना हाताशी धरून केले. या लढ्याला चिरडून टाकण्यासाठी पोलीसांच्या माध्यमातून प्रचंड दडपशाही करण्यात आली व पोलीसांकडून अमानुष अत्याचार करण्यात आले. आंबेडकरी चळवळ मूळासकट उखडून टाकण्याचा प्रयत्नही यावेळी झाला. काँग्रेस आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांनी दलितांच्या घरदाराची राख-रांगोळी . केली आणि महिलांची बेअब्रू केली. शिक्षणामुळे ज्यांना नोकऱ्या लागल्या, त्यांची आर्थिक स्थिती सुधारलेली होती, आणि त्याचप्रमाणे ज्यांच्यामध्ये जायकवाडी धरणामुळे समृद्धी आलेली होती अशांची ही समृद्धी या दंगलीत अक्षरश उध्वस्त करण्यात आली. दडपशाही व अत्याचार करून पुन्हा आंबेडकरी चळवळं आपल्या  विरोधात उभी राहू नये, असा डाव कॉंग्रेसने रचला होता. काँग्रेसचे नेतृत्व हे मराठा समाजाचे नेतृत्व होते. ‘मराठवाडा विद्यापीठ’ या नावात ‘मराठा’समाज स्वत:ची अस्मिता पाहत होता. नामांतर म्हणजे मराठ्यांना संपविणे व आपल्ली सत्ता काढून घेणे, असा प्रचार हितशत्रूंकडून त्या काळात करण्यात आला. त्याचे गांभीर्य लक्षात न घेता आंदोलन चालविले गेले. त्याचे पर्यवसान आंबेडकरी अस्मिता विरूद्ध मराठा अस्मिता असा लढा लढविण्यात झाले. परिणामी दंगल झाली दंगलीत अनेक दलित व आंबेडकरवाद्यांची घरे उध्वस्त करण्यात आली. जाळण्यात आली. त्यांचा बहिष्कार टाकण्यात आले कत्तली करण्यात आल्या. आणि दलितांना एकांगी पाडण्यात आले!
त्यावेळी या परिस्थितीला बदळणे आणि शांतता प्रस्थापित करणे याला प्राधान्य देणे हेच महत्वाचे होते आणि ते मी केले. मराठवाड्यातील गावोगावी जावून भांडण मिटविणे, सामंजस्य निर्माण करणे, ज्यांचे नुकसान झाले आहे
त्यांच्या पुनर्वसनासाठी लढणे आणि अक्रास्ताळी भाषणांची धार बोथट करणे यासारखी कामं अंगावर घेतली. या भूमिकेमुळे माझ्याबद्दळ समज–गैरसमज पसरले. मी त्याची कधीही पर्वा केली नाही. या आंदोलनात काहींनी घेतलेल्या अतिरेकी भूमिकांमुळे (ज्या भूमिकांना मी बेजबाबदारपणा म्हणतो, नामांतराचा लढा हा सरकारविरोधी लढा होता तो तसाच ठेवला गेला पाहीजे होता. त्याला पहिल्या टप्प्यात मराठाविरोधी स्वरूप येवू दिले आणि नंतर ते पोलिस विरोधी झाले. आंदोलनकर्ते त्यामुळे कोंडीत सापडले. याचा फायदा मराठा नेतृत्वाने पुरेपूर उचळला .) पोलिसांचा अत्याचार ओढवून घेतला. याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये एक प्रकारची दहशत बसली होती. या कारणास्तव मोर्चाला यायचे म्हणजे पोलिसांचा लाठीमार खायचा; अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे नंतर लोक मोर्चालासुद्धा यायचे थांबले. मनाने ते हरंले होते. अत्याचार. मारझोड. दडपशाहीमुळे खचलेल्या सैन्यामध्ये नवीन विश्वास निर्माण करण्याची गरज होती. त्यासाठी लोकांमध्ये पुन्हा एकदा चळवळीबाबत विश्‍वास निर्माण होईल असे कूतीशील कार्यक्रम देणे आवश्यक होते. आंबेडकरी चळवळीत ‘मोर्चा’ व सभा हे सर्वात मोठे हत्यार राहिले आहे. लोकआंदोलन हे मोठे शस्त्र आहे. ते मोडणे म्हणजे चळवळीला कमकुवत करणे होय. असाच अर्थ त्याकाळी लोक लावत होते. दुसऱया शब्दात सांगायचे झाल्यास, चळवळ संपविण्याच्या मार्गावर घेवून जाणे. म्हणून आम्ही १९८२ साली आठ दिवसांचा लाँगमार्च काढला. जसा जसा हा ‘मार्च’ पुढे पुढे जात राहिला; तसा तसा लोकांमध्ये विश्‍वास वाढत गेला. ज्यावेळी मुंबईला हा मोर्चा पोहोचला, त्यावेळेस लाखोंच्या संख्येने ग्रामीण जनता त्यात सहभागी झाली होती. शहरी भागातील माणूस जो या मोर्चामध्ये होता तो वेगळाच. लॉगमार्चने उपस्थित केलेल्या प्रश्‍नावरती त्यावेळी विधानसभेत चर्चा झाली. आणि तात्पुरती का होईना या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. यातून आपले प्रश्‍न मार्गी लागू शकतात हा नवा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्रातील राजकीय अभ्यासक व पोलीस खात्याला मोठी चिंता वाटत होती, की; आंबेडकरी चळवळ चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात चळवळीतील कार्यकत्यींवर जो अमानुष अत्याचार झाला त्याचा परिणाम म्हणून, तो नक्षलवादी चळवळीकडे वळतो की काय; अशी  चिंता एका वरच्या पातळीवर केली जात होती. हे त्यावेळी फार थोड्या लोकांच्या लक्षात आले होते. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर व चळवळीतील जनतेवर जे अमानुष अत्याचार झाले त्याचा परिणाम म्हणून नक्षलवादाकडे वळतो की काय ही परिस्थिती लॉगमार्चच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलीसांना वाटत होती. या भितीला खतपाणी घालायचे त्यांनी ठरविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *