चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी बौद्ध लेणी

लेणी

भारतातील महाराष्ट्र राज्यात  रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात कोळकेवाडी  गाव आहे आणि या गावाच्या पाठी उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील एका टोकावर हि बौद्ध लेणी आहेत
इतिहास : साधारणपणे ह्या लेण्यांचा इतिहास सापडत नसला तरी ती बौद्ध लेणी असल्याचे अवशेष मात्र या लेण्यावर आहेत  काहींच्या मते हि लेणी शिलहार राजांच्या  काळात बांधली असे म्हटले जाते पण याला पुरावा नाही हि लेणी अतिप्राचीन लेणी वाटतात कोकणातील सर्वात जुनी लेणी म्हणून कोळकेवाडी लेण्यांचा उल्लेख करावा वाटतो . पितळखोरा लेणी हि सर्वात प्राचीन लेणी आहेत त्या लेण्या साधारण इसवी सन पूर्व दुसरे शतक या मध्ये बांधलेली आहेत  याच गोष्टीचा आधार घेत कोळकेवाडी इथली लेणी हि इसवी सन पूर्व पहिल्या शतकात  कोरलेली असावीत असे दिसते  कारण एवढ्या उंच भागात लेणी बांधण्याची आवश्यकता काय असावी शिवाय हे असे ठिकाण आहे कि इथे पोहचणे सहज शक्य नाही साधारण ह्या लेण्यावर जाण्यासाठी कमीत कमी अडीच तास व जास्तीत जास्त चार तास लागतात
लेणी बांधकाम हे सातवाहन यांच्या  काळातील असावे  असे एकूण लेणी बांधकाम शैली वरून वाटते कारण पहिल्या लेण्यावर स्तूपाचे अवशेष आहेत जिथे स्तुपाची वेदिका स्पष्ट दिसते बाजूंला  पाच स्तंभाचे भाग आहेत शिवाय हि लेणी भरलेली आहेत त्यामुळे पाण्याचे टाके हि भरलेले आहे आणि त्यामुळे  जो पाण्याचा साठा हा लेण्यातच   झाला आहे
स्तूपाचे अवशेष पाहता हि लेणी इसवी सन पूर्व काळातच च कोरलेली आहेत याची पुष्टी होते कारण विदेका हि सध्या पद्धतीचे आहे जास्त कोरीव काम नाही  त्यामुळे याच निष्कर्षावर येतो कि हि लेणी इसवी सनपूर्व  पहिल्या शतकात  कोरलेली असावे
या लेण्यांचे बांधकाम  हे गौतमी पुत्र सातकर्णी याच्या राजवटीत झाले असावे असे दिसते कारण गौतमी पुत्र सातकर्णी  यांनी नहपान राजाकडून कोकण म्हणजे अपरांत जिंकून घेतला होता शिवाय गौतमी पुत्र सातकर्णी याला  ‘त्रि-समुंद्र-तोय-पीत-वाहन’  हि उपाधी  लावली जाते याचा अर्थ तो तो तिन्ही समुद्रावर सत्ता असणारा राजा होता हे सिद्ध होते शिवाय कोळकेवाडी हे असे ठिकाण आहे जो घाट माथ्याचा प्रदेश आहे भिक्खुच्या अभ्यासासाठी हि लेणी कोरलेली आहेत हे सिद्ध होते कारण एवढ्या उंचीवर लेणी असण्याचे कारण हि भिक्खुच्या अध्ययन करण्यासाठीच असावी कारण इथे एकच प्रार्थनागृह असून बाकीचे लेणी हि भिक्खूगृह आहेत  व एक बुद्ध स्वरूप असणारे बुद्ध  विहार आहे गावकऱ्यांच्या माहितीनुसार या ठिकाणी एक महापरिनिर्वाण अवस्थेतील बुद्ध स्वरूप आहे असे सांगितले  जाते ते याच लेण्यात गाडले गेले आहे कारण हि लेणी पूर्ण भरलेली आहे
ह्या लेण्याच्या चारी बाजूंला कडा आहे त्यामुळे इथे कोणत्याही व्यक्तीचे हस्तक्षेप होवू शकत नव्हते यासाठीच हि लेणी कोरलेली आहेत
शिवाय लेण्याच्या खाली जंगलात विविध प्रकारचे औषधी वनस्पती आहेत
लेणी बांधकाम साधे आहे पण अतिशय टोकावर आहे याचे एकमेव कारण असू शकते कोणत्याही लोकांचा हस्तक्षेप होवू नये हेच एकमेव कारण असावे

साधारण लेण्यांचा इतिहास कोकणातील प्राचीन लेणी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो

अपरांत म्हणजे कोकण आणि या भागावर सातकर्णी चे अधिराज्य होते नहपान ला हरवून गौतमीपुत्र सातकर्णी ने आपले अधिपत्य या भागात निर्माण केले होते
साधारण याच काळात हि लेणी कोरलेली असून हि भिक्खुंच्या अध्ययनासाठी तयार केलेली लेणी आहेत

सविस्तर लेणी पाहू या
लेणी क्रमांक १:

लेणी क्रमांक १ स्तूप असणारे चैत्यगृह

कोळकेवाडी हि बौद्ध लेणी असून हे  स्तूप असणारे प्रार्थना स्थळ आहे या ठिकाणी स्तूपाचे अवशेष आहेत मध्यभागी स्तुपाची वेदिका स्पष्ट दिसते
बाजूंला  कोरीव स्तंभ आहेत जे लेण्याच्या चारी बाजूंना  पाहायला मिळतात सध्या हि लेणी भरलेली आहेत  तिथले उत्खनन केल्यास स्तुपाचा अवशेष मातीखाली गाडला गेलाय तो नक्कीच सापडू शकतो
दुसरी गोष्ट ह्या लेण्यांचे प्रवेशद्वार छोटे आहे त्याला कमान असू शकते एकंदरीत त्याचे अवशेष आपणास पाहायला मिळतात त्याचे स्तंभाचे खांब तिथे पडलेले आहेत सध्या भरलेल्या अवस्थेत लेण्यांची उंची हि चार फुट इतकी आहे  व पाण्याचा साठा या लेण्यात झाला आहे कारण पाण्याचे टाके बुजलेले असल्यामुळे सदर पाणी हे या लेण्यात साठवणूक झालेले आहे हे एक प्रार्थनास्थळ आहे याच्या एकूण मांडणी नुसार हे साधारण इसवी सन पूर्वी पहिल्या शतकातील असावे हि हीनयान काळातील लेणी आहेत

 

लेण्यामध्ये सध्या काही लोकांनी विरगळ च्या मुर्त्या ठेवल्या आहेत व एक पिंडी सारखे दिसणारे अवशेष आहे ते दरवाजावरील अवशेष आहे
साधारण स्तुपाची वेदिका भग्न अवस्थेत आहे व जवळपास हि अर्धी लेणी भरलेली आहेत सध्या पाण्याचा साठा झालेला आहे

लेणी क्रमांक २ :

लेणी क्रमांक २
लेणी क्रमांक २

हि लेणी एक विहार लेणी आहेत त्यांच्या वरचे छप्पर तुटलेले आहे हि लेणी लेणी क्रमांक एक च्या वरच्या भागात आहेत  हि लेणी देखील भरलेली आहेत  इथे फक्त संघाराम आहेत जे भिक्षूंच्या अध्ययन करण्यासाठी असतात अश्या पद्धतीची आहेत इथे पाण्याचे टाके अस्तित्व होते पण ते अश्या नष्ट  झालेले आहे
लेण्या भरलेल्या असल्यामुळे अर्धवट बांधकाम आपणास पाहायला मिळते
या लेण्यात कोणते हि कोरीव काम दिसत नसले तरी  लेण्या आकर्षक वाटतात शिवाय अतिशय उंचीवर असून समोर दरी आहे  याच लेण्यातून पुढच्या लेण्यावर जाण्यासाठी मार्ग आहे सध्या अतिशय भग्न अवस्थेत हे पडलेले आहेत लेण्याचे छत पडलेले असून आतील भागात मात्र चांगले आहे परंतु त्यात मातीने पूर्ण भरलेली आहेत हि देखील हीनयान पद्धतीची लेणी आहेत  एकूण इथे हीनयान काळात या लेण्या बांधल्या आहेत हि देखील एकाच काळात लेणी कोरलेली आहेत असे दिसते

लेणी क्रमांक ३:

लेणी क्रमांक ३
लेणी क्रमांक ३

 

लेणी क्रमांक ३
लेणी क्रमांक ३

 

 

हे प्रमुख लेणे असावे इथे लेणे पाहता इथे महापरिनिर्वाण स्वरुपात बुद्ध स्वरूप असण्याची शक्यता  आहे सध्या हे लेणे पूर्ण भरलेले आहे आतमध्ये जाण्यास अतिशय छोटा रस्ता आहे अगदी आडवे होवून आत शिरावे लागते  इथे दोन स्तंभ तुटलेल्या अवस्थेत आहेत व कमान पाहता  एक कोरीव लेणे आहे इथे  अतिशय भव्य असे विहार आहे साधारण उंची पाहता २० फुट उंच विहार आहे समोर पूर्ण मातीने भरल्यामुळे आत जाण्यासाठी रिक्स आहे  इतर जंगली जनावरे आत असू शकतात
स्तंभाची पद्धत पाहता ती अनेक लेण्यातील चैत्य गृह सारखी दिसते
या लेण्यात दोन स्तंभ शीर्ष भाग च आपणास पाहायला मिळतात तसेच बाजूस स्तंभाचे कोरीव काम आहे
लेण्याला अर्धवर्तुळाकार कमान असून त्यावरून त्या जागी स्तूप कोरलेला  असू शकतो जसे आपण भाजे लेणी कार्ला लेणी कान्हेरी लेणी एलोरा लेणी अजिंठा इथली मोठी चैत्य पाहतो त्यांची जी मांडणी आहे तशीच पण अर्धवर्तुळाकार मध्ये हि मांडणी आहे जसे स्तुपला प्रदर्शना घालण्यासाठी जागा आहे शिवाय हि उंच आहेत सध्या भरलेली आहेत  उत्खनन झाल्यास त्याचे अवशेष आपणास सापडू शकतात
या लेण्याचा पुढचा भाग मातीच्या ढिगाऱ्या मुळे झाकला गेलाय त्याचे उत्खनन करून ती जागा मोकळी केल्यास प्रशस्त अशी जागा आहे त्याच्या बाजूंला पाण्याचे टाके आहे पण ते पूर्ण भरलेले आहे समोर दरी आहे व समोर एक झाड आहे त्याच्या सहाय्याने पुढच्या लेण्याकडे जाण्यास वाट आहे लेणी अतिशय उंचावर आहेत भारतातील सर्वात उंचावर हि एकमेव बौध्द लेणी आहेत
या लेण्यात विशेष महत्व म्हणजे हे प्रमुख लेणे आहे अतिशय उंच व कोरीव काम केलेलं लेणे आहे यात साधारण आत गेल्यावर अंदाज  येतो कि त्याची भव्यता किती मोठी आहे
यात अजून एक वैशिष्ट्य असणरी गोष्ट म्हणजे सध्या या लेण्यात मध्यभागी पाण्याचे एक एक थेंब पाणी पडते आहे   हे पाणी पडण्याचे एकेमेव कारण पावसाचे पाणी जे पाण्याच्या टाक्यात नेण्याचा मार्ग बंद झाल्याने ते वरतीच जमिनीत मुरले गेले व ते कातळातून थेंब थेब पडू लागले आहे  हि जागा स्तूपाच्या वेदिकीची असू शकते असा अंदाज आहे
हे लेणे देखील हीनयान काळातील आहे यात कोणते लिखित लेख सापडत नाहीत तरी बांधकाम शैली वरून ते इसवीसन पूर्वीची लेणी आहेत हे निश्चित म्हणता येईल
हे महत्वाचे चैत्य गृह आहे

लेणी क्रमाक ४ आणि ५ :

लेणी क्रमांक ४

 

लेणी क्रमांक ४

 

लेणी क्रमांक ५

 

लेणी क्रमांक ५

हे लेणे तीन नंबर च्या बाजूंला खालच्या भागात आहे हे निवास्थान  असणारे लेणे आहे शिवाय यात कोरीव काम असणारे खिडक्या आहेत बाजूची पडझड झालेली आहे भग्न अवस्थेत हि पडलेली आहेत
हि लेणी भिक्खू लोकांच्या निवास स्थानासाठी बांधलेली असावीत  आणि विशेष म्हणजे हि लेणी डबल मजली आहेत तळ मजला व वरती एक माला अश्या पद्धतीने आहेत या लेण्यातून आतल्या लेण्यात प्रवेश करण्यासाठी जागा आहे व त्या जागी एक लाकडी दरवाजा असण्याची शक्यता आहे कारण दरवाजा लावण्यासाठी असणाऱ्या खोबण्या आपणास तिथे पाहायला मिळतात
पुढच्या भागात आपण पहिले तर तळ मजला हा सध्या पद्धतीने बधालेलें  आहे बाजूस दोन  अर्धवट कोरलेल्या खोबण्या आहेत कदाचित तिथे एक संघाराम कोरण्यासाठी केलेला प्रयत्न  आहे समोरून पाहिल्यास दोन मजली लेणी आपणास दिसतात  याचा खाली साधारण कोरीव काम आहे व वरती झोपण्यासाठी पलंग सारखे बांधकाम केलेलं आहे यात झोपण्याची जागा असावी व वरच्या बाजूंला खिडकी कोरलेली आहे जशी आपण कोंडीवते लेण्यावर मुख्य स्तुपाजवळ जश्या खिडक्या आहेत तश्या पद्धतीच्या खिडक्या इथे आपणास पाहायला मिळतात त्यानंतर आत मधील लेणीत जाण्यासाठी इथूनच मार्ग  आहे साधारण पायऱ्या कोरलेल्या आहेत ज्याच्या मध्यमतून आत जाता येईल आत गेल्यावर आपणस  एक विहार पाहायला मिळेल ज्याला आपण संघाराम  म्हणू शकतात आत मध्ये कोरीव स्तंभ आहे सध्या तो भग्न अवस्थेत आहे शिवाय  चैत्याच्या घुमटा सारखी त्याची कमान आहे साधारण  त्याची उंची एक १५ ते २० फुटा इतकी आहे  सध्या मात्र इथे वट वाघालांचा जास्त प्रभाव आहे त्यामुळे श्वास घेणे कठीण होते इथे असणरी माती शेतीसाठी अतिशय फायदेशीर असे सेंद्रिय खत आहे या लेण्यातून लोक ती माती घेवून खाली जातात
लेण्याची एक बाजू थोडी पाडली आहे त्यामुळे बाजूच्या लेण्यात जाण्यास हि वाट मोकळी आहे इथून
साधारण या दोन मजली लेण्या पाहता यांचे बांधकाम हि अर्धवट ठेवलेले आपणास पाहायला मिळते इथला दगड ठिसूळ आहे तरी लेणी मात्र दिमाखात उभी आहेत भारतातील सर्वात उंच लेणी असण्याचे स्थान यांना आहे

लेणी क्रमांक ६ :

लेणी क्रमांक ६

 

लेणी क्रमांक ६

 

लेणी क्रमांक ६

हि अत्यंत साधी पद्धतीची लेणी आहेत विहार लेणी म्हणता येतील आतमध्ये कोणतेही कोरीव काम नाही केवळ चर्चा करण्यास व राहण्यास याचा वापर होत असावा यापलीकडे दुसरे काही  म्हणता येत नाही तरी लेण्यांची मांडणी अतिशय सोपी आपल्याला पाहायला मिळते लेण्यात पाण्याचे टाके नाही साधी लेणी आहेत  इथे समोर थेट सह्याद्री पर्वतरांग आहे जे डोळ्यांचे पारणे फेडावे असे आहे हि लेणी पाहता साधारण संघाराम आहे भिक्खू लोकांच्या राहण्यासाठी तयार केलेली आहेत  सध्या मात्र भग्न अवस्थेत आहेत

सध्या आपण याच सहा लेण्यात जाण्याचा प्रयत्न केलेला आहे पण यात वरती कड्यावर मात्र लेण्यांचे  छत पडलेली काही लेणी आपणास पाहायला मिळतात ज्यांची छत वरून पडलेले आहे साधारण दोन अशी लेणी आहेत एक लेणी क्रमांक  एक च्या वरती आहे व दुसरे हे लेणी क्रमांक २ च्या वरती आहे यांचे छत पडलेले आहे  त्याचा कोरीव पणा स्पष्ट दिसतो यावरून हि लेणी झोपण्यासाठी बांधलेलि असावीत असे अंदाज वर्तवला जावू शकतो

त्यांनतर सर्वात वरच्या भागात जाणे अतिशय कठीण आहे वरती एक पठार आहे व पथावर एक चौथरा आहे जो पाहिल्यास असे भासते कि इथे एखादे वास्तू असण्याची शक्यता आहे इथे बुद्ध मूर्तीचे छोटे स्वरूप आपणास पाहायला मिळते
त्याच्या बाजूंला काही  मुर्त्या आहेत त्या मात्र भग्न अवस्थेत हेत व त्या विरगळ आहेत त्यांचा काळ व बुद्ध मूर्तीचा काळ यात खूप अंतर आहे

ह्या चौथरा  कोणी गडकोट आहे असे म्हणते तर कोणी अजून काही पण हा किल्ला आहे याला कोणते प्रमाण नाही कारण तसा इतिहास हि सापडत नाही कारण सह्याद्रीचे उंच शिखर आहे हे समोरहि सह्याद्रीचा कडा संरक्षण भिंतीसारखा उभा आहे  व तेथील  घनदाट अरण्याचा अंदाज येतो  वास्तविक इथे जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आहे

हि अशी कोळकेवाडी ची बौद्ध लेणी आहेत ती भारतातील सर्वात उंच ठिकाणी असणारी लेणी आहेत लेणी जवळपास ३००० ते ३५००  फुट उंचीवर आहेत  व इतक्या उंचावर पाण्याची व्यवस्था केलेली पाहून आश्चर्य वाटेल आपणास कि एवढ्या उंचावर पाणी कसे साठवले जात असेल
या बौद्ध लेण्या आहेत यात तिळमात्र शंका नाही कारण इथे कुणाला हि  अनधिकृत पणे जागा बळकावणे शक्य नाही कारण इथे जाण्यास जागा अतिशय बिकट असल्याने या लेण्यांचे इतर लेण्यात बदल करणे  कुणाला शक्य झाले नाही नाही तर इथे हि शिव आपणास पाहायला मिळले असते पण ते  एवढ्या वरती पिंडी घेवून जाने हि सर्वात  कठीण आहे त्यामुळे इथे तसा प्रयत्न झालेला नाही त्यामुळे इथले बौद्ध लेण्यांचे अस्तित्व कायम आहे

पोहोचण्याच्या वाटा :
चिपळूण – कराड रस्त्यावर चिपळूणपासून ५ किमी वर “अलोरे” गाव आहे. या गावातून एक रस्ता ५ किमी वरील “कोकळेवाडी” गावात जातो. कोकळेवाडी गावाच्या टोकाला बुध्दवाडी आहे. येथपर्यंत एस. टी ची बस येते. येथून एक कच्चा रस्ता ४ किमी वरील धनगरवाडीकडे जातो. पावसाळा सोडून इतर वेळी जीप सारख्या वाहनाने आपण धनगरवाडीच्या १ किमी अलिकडे असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी जाऊ शकतो. येथे गाडी ठेऊन उजव्याबाजूच्या कच्च्या रस्त्याने अर्धी टेकडी चढल्यावर, डाव्या बाजूला एक पायवाट गर्द रानात शिरते. या पायवाटेने आपण लेण्यावर वर पोहोचतो.
लेण्यावर जाण्यासाठी अतिशय बिकट रस्ता आहे पुरातत्व खात्याने लक्ष दिल्यास नक्कीच

चांगला मार्ग तयार होवू शकतो
लेण्यावर  जाण्याची वाट फारशी वापरात नाही. तसेच या भागात भुकंपाचे धक्के वारंवार बसत असल्यामुळे लेण्या वरील पायवाटा धोक्याच्या झालेल्या आहेत. त्यामुळे बुध्दवाडीतून वाटाड्या घेऊन लेणी  पहाणे योग्य ठरते.

रविंद्र मिनाक्षी मनोहर
गडकोट लेणी संशोधक
ब्राह्मी लिपी अभ्यासक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *