बाबासाहेबांच्या लग्नासाठी वडीलांना भरावा लागला दंड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब अर्थात डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी सुभेदार रामजींना फार त्रास घ्यावा लागला मुलाला शोभेल अशी अनुरुप वधू पाहिजे. जो कोणी मुलीचा पत्ता सांगत असे तिकडे न चुकता सुभेदार रामजी जात होते. त्यासाठी त्यांचा बराच वेळ खर्च करावा लागला नंतर सुभेदार रामजींनी एक मुलगी भिमरावांसाठी पसंत केली चाळीतील लोकांच्या रीतीरिवाजा प्रमाणे साखरपुडाही केला. पुढे काही दिवसांनी त्यांचा मित्राणे सांगितले की, एका ठिकाणी मुलगी सुंदर सुस्वभावी व शरीराने बाधेसूद आहे. पहिल्या मुलीपेक्षा दुसरी मुलगी आवडली तेव्हा रामजींनी साखरपुडा रद्द केल्याचा पहिल्या मुलीच्या आई वडिलाना सांगितले मुलीच्या आई वडिलानी पंचायतीमध्ये न्यायाची मागणी केली पंचमंडळीनी योग्य न्याय देऊन साखरपुडा रद्द केल्याबद्दल रामजी आंबेडकर यांना दंड भरावा लागला. दुसरी मुलगी पाहिली ती पसंत पडली आणि त्या मुलीचा साखरपुडाही त्यानी केला, पण पहिल्या साखरपुड्याप्रमाणे दुसराही साखरपुडा रद्द केला आणि पंचायतीला दंड भरावा लागला.

असाप्रकारे दोन्ही मुलींसाठी साखरपुड्याचा कार्यक्रम झाला आणि दोन्ही वेळा रद्द झाला दोन्ही वेळा साखरपुड्याचा दंड भरावा लागला. शेवटी त्यांना कोणीतरी भिकाजी वनंदकरांची मुलगी रमा, पत्राच्या चाळीत आपल्या भावासोबत राहत असे सांगितले शेवटी हीच मुलगी भिमरावांसाठी पसंत केली आणी लग्नाची तारिख ही निश्चित करण्यात आली. भिमराव यांचे लग्न कुठल्याही खेड्यात किंवा चाळीत झाळे नाही मायखळा स्टेशन जवळ एका लहानश्या मंदीराजवळ लग्न सोहळा झाला. आता लग्नात हजारो रुपये कर्ज काढूण लोक खर्च करतात आणि आर्थिक अडचणीत येतात. तसे भिमरावांचे लग्नानात झाले नाही काही लोकांना जेवण्यासाठी ताट कमी पडल्यामुळे तव्यामध्ये वाढावे लागले. दोन मुलींच्या साखरपुडा रद्द  केल्यानंतर तिस‌‌-या मुलीची जी निवड सुभेदार रामजी यांनी भिमरावासाठी केली, ती फार यशस्वी ठरली. त्यावेळेस भिमरावांचे वय १७ वर्षांचे व रमाबाई चे वय ९ वर्षांचे होते.

– संदर्भ : – डॉ बाबासाहेबांच्या आठवणी
– लेखक :- चं. पु. इलमे ( प्रकाशन : नेहा प्रकाशन १२०, गुरुनानकपुरा नागपुर, १७ )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *