रमाई आवास घरकूल योजना

सामाजिक न्याय विभाग योजना

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास घरकूल योजना

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1.27 योजनेचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास (घरकूल)योजना (नागरी व ग्रामीण)
योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.36/मावक-2,दि.15/11/2008शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.9/03/2010 

शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.6/08/2010

शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.2/12/2010

शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.35/मावक-2,दि.14/03/2011

शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.29/09/2011

शासन निर्णय क्र.रआयो-2011/प्र.क्र.10/बांधकामे,दि.18/7/2014

2. योजनेचा प्रकार राज्य
3. योजनेचा उद्देश अनुसूचित जाती व नवबौध्द कुटूंबांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवा-याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर बांधून देणारी घरकुल योजना शासन निर्णय, दिनांक 15 नोंव्हेंबर 2008 पासून सुरु करण्यात आली आहे.
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी
5. योजनेच्या प्रमुख अटी लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य 15 वर्षे असणे आवश्यक. 

अर्जदाराच्या कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्र रु 1.00,000/-, नगरपालिका क्षेत्र रु 1.50 लाख आणि महानगर पालिका क्षेत्र रु 2 लाख इतकी आहे.

सदर योजनेचा लाभ कुटूंबांतील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थ्याने शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप घराच्या बांधकामासाठी क्षेत्र निहाय कमाल खर्चाची मर्यादा ग्रामीण क्षेत्र रु 1,00,000/- व नगरपालिका क्षेत्र रु 1.50 लाख व महानगरपालिका क्षेत्र रु 2 लाख इतकी आहे.
लाभार्थी हिस्सा ग्रामीण क्षेत्र निरंक, नगरपालिका क्षेत्र 7.5 टक्के, महानगरपालिका क्षेत्र 10 टक्के इतका आवश्यक.
ग्रामीण भागातील कुटूंबांला लाभार्थी हिस्सा भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
दिनांक 29-9-2011 चे शासन निर्णयानुसार शहरी भागात दारीद्रयरेषेखालील पुरेशे लाभार्थी उपलब्ध होत नसल्याने दारीद्रयरेषे वरील लाभार्थ्याना सुध्दा घरकुल योजनेचा लाभ देण्यांत येत आहे. सदर लाभ देण्यासाठी शासन निर्णय दिनांक 9-3-2010 मध्ये नमूद केल्यानुसार अर्जदार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा, त्यांच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा व लाभार्थी स्वहिस्सा खाली प्रमाणे :-
नगरपालिका क्षेत्र रु 1.50 लाख 7.5 टक्के लाभार्थी हिस्सा
महानगरपालिका क्षेत्र रु 2.00 लाख 10 टक्के लाभार्थी हिस्सा
7. अर्ज करण्याची पध्दत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण/प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, संबंधीत नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका यांचेमार्फत
8. योजनेची वर्गवारी विशेष सहाय्य
9. संपर्क कार्यालयाचे नांव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण/जिल्हाधिकारी/प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद/संबंधीत महानगरपालिकेचे आयुक्त

सांख्यिकी माहिती ( ₹ लाखात)

अ.क्र. वर्ष ग्रामीण शहरी
खर्च लाभार्थी खर्च लाभार्थी
1. 2012-13 31999.80 35853 1999.00 2030
2. 2013-14 23962.06 5115 1600.00 1000
3. 2014-15 23495.15 3193 738.28 3301

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *