इयत्ता 11 वी, 12 वी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ची सन 2016-17 पासून सामाजिक न्याय विभागाने सुरूवात केली आहे.
- शासन निर्णय :-
1. शासन निर्णय क्रमांक- बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण-2 दिनांक 06 जानेवारी 2017
2. शसन शुद्धिपत्रक क्रमांक बीसीएच-2016/प्र.क्र.293/शिक्षण -2 दिनांक 06 जानेवारी 2017
3. शासन ज्ञापन क्रमांक- बीसीएच-2017/प्र.क्र.54/शिक्षण-2 दिनांक 07 जुलै 2017
5. शासन निर्णय क्रमांक बीसीएच-2016/प्र.क्र. 293/शिक्षण-2 दिनांक 13 जून 2018
6. शासन शुद्धिपत्रक क्रमांक – बीसीएच-2016/प्र.क्र./शिक्षण-2 दिनांक 03 नोव्हेंबर 2018प्रस्तावना :-
• उद्दिष्ट:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना हि इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करणे करिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यास शासनाने दिनांक 06 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयान्वाये मान्यता दिलेली आहे.• अटी व शर्ती
• विद्यार्थी अनु. जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा.
• विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा ( महानगरपालिका क्षेत्रातील )
• महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. पर्यंतच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
• विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
• इयत्ता 12 वी नंतर पदविका, पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा.
• इयत्ता 12 वी मध्ये विद्यार्थ्यांस किमान 50% (उतीर्ण) गुण असावे
• या योजनेमध्ये दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द) विद्यार्थ्यांना 3% आरक्षण असेल व गुणांची टक्केवारी 40% इतकी असेल• लाभाचे स्वरूप
अ.क्र. | खर्चाचीबाब | मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम | इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित ‘क’ वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी अनुज्ञेय रक्कम | इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था या ठिकाणी अनुज्ञेय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 |
1 | भोजन भत्ता | 32000/- | 28000/- | 25000/- |
2 | निवास भत्ता | 20000/- | 15000/- | 12000/- |
3 | निर्वाह भत्ता | 8000/- | 8000/- | 6000/- |
प्रति विद्यार्थी एकूण देय रक्कम | 60000/- | 51000/- | 43000/- |
या योजनेचा लाभ घेण्यासाठी xxxxxxxxxxxxxxxxxx या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणेआवश्यक आहे.
टिप :- वरील रक्कमे व्यतरिक्त शैक्षणिक साहित्य खरेदी करीत अनुशेय रक्कमा.
१. वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशीत विद्यार्थ्यांकरिता – रू.५०००/-
२. इतर शाखेतील प्रवेशीत विद्यार्थ्यांकरिता – रू.२०००/-
• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २०१८
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
मागील वर्षाची माहिती दर्शविणारा तक्ता