आंबेडकरी चळवळ संपली आहे

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
डॉ. वाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ कशी उभी केली; याचा शोध घेण्याचा मी एक प्रयत्न केला तो माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे त्यानिमित्ताने, मी १९८० साली पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण या जिल्ह्यांचा दौरा केला. जुन्या माणसांशी बोललो. त्यांनी बाबासाहेबांच्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन केळे, आठवणी सांगितल्या. बाबासाहेबांची ज्यावेळी चावडीत बैठक चालू असायची त्यावेळी अनेक ज्ञातीबांधव मुद्दामहून चावडीत झोपण्यास येत असत. ते बाबासाहेबांना उदेशून म्हणत की, “हा काय करणार आहे? हा तर आमची हाडकी–हाडोळी, आमचे बावन्न अधिकार काढायला निघालाय. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे कोणी या चळवळीला सहकार्य करतील, त्यांना बरोबर घेवून आपली चळवळ पुढे नेली. याचा अर्थ असा की, त्यावेळीही समाजात काही जागरूक लोक होते, तर काही जागरूक नव्हते. जे जागरूक होते ते बाबासाहेबांबरोबर आले. जे नव्हते, ते बाजूला थांबले. कालांतराने ज्यांनी बाबासाहेबांना सहकार्य केले नाही- तेही चळवळीत आले. त्यावेळी ज्यांना हाडकी–हाडोळी हेच आपल्या सुरक्षिततेचे कवच वाटत होते; तेच बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहिले. पण जेव्हा त्यांना ‘हाडकी–हाडोळी’ हे सुरक्षिततेचे कवच नाही, तर गुलामीची निशाणी आहे हे लक्षात आले; त्यावेळी त्यांनी आपला पवित्रा बदलला व ते आंबेडकरी चळवळीचे वाटसरू बनले. हे या ठिकाणी सांगण्याचे कारण की, जी परिस्थिती असते तिच्यात बदल करण्यास लोक लगेच तयार होत नसतात. अशा वेळी नवी व्यवस्था निर्माण करण्यासंदर्भात जी सतर्कता त्यांच्यात हवी असते. ती तयार झालेली नसते. माझा राजकीय जीवनातील चोवीस वर्षाचा अनुभव मला हेच सांगते आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक जुनी व्यवस्था बदळून त्याजागी नवी व्यवस्था निर्माण केली. त्यातून आपल्याला जे अधिकार मिळाले त्या लाभामध्येच आज आपण ‘मदहोश* आहेत. परिस्थिती बदलली आहे. या
बदलत्या परिस्थितीत आपल्याला नव्याने अधिकार मिळवावे लागतील. किंवा जे अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी मिळवून दिले आहेत, ते शाबूत ठेवण्यासाठी जागरूक रहावे लागेल. या संदर्भात समाजात काही दिवस चर्चा घडते आहे, कृती होत आहे- असे मला काही दिसत नाही. बाबासाहेबांनी जी चळवळ मोठ्या कष्टाने उभी केली, तिच्या प्रारंभीच्या काळाचा अभ्यास होणे, तिची चिकित्सा होणे मला गरजेचे वाटते. त्यामधून आज आपल्यापुढे जी नवी आव्हाने उभी आहेत, ती पेलून; चळवळ टिकविण्यासाठी उपयुक्‍त असे ज्ञान मिळेल. आजवर यासंबंधातले संशोधनात्मक लेखन कमीच झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *