अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-३)

 

आंबेडकरी चळवळ संपली आहे – प्रकाश आंबेडकर (भाग-२)

सतरा लाख मतदार

लोकशाहीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीची ताकद तिला मिळणाऱ्या मतदानातून दिसते. निवडणूक हे साधन आहे. निवडणुकीमध्ये हे सामर्थ्य दाखविणे आवश्यक असते. आंबेडकरी चळवळ जी निवडणुकीपासून कोसभर दूर गेली होती. एवढेच नव्हे, तर समझोत्याच्या राजकारणापायी स्वत:चे राजकीय अस्तित्व हरवून बसली होती; काही निवडणुकांमध्ये अशाही घोषणा झाल्या होत्या की, ‘सीट और नो सीट, व्होट फॉर कॉंग्रेस ‘- तिला निवडणुकीच्या आखाड्यात आणण्यासाठी १९८५-८६_ च्या विधानसभा, लोकसभा निवडणूका लढवून पक्षाने १७ लाख मते मिळविली. हेच पक्षाचे खरे मांडवळ, त्यांनतर अनेक लढे व निवडणुका झाल्या. पक्षावरचा विश्वास ढगमगळा नाही. या १७ लाख मतदारांच्या जोरावर आम्ही सत्ता या बाजूची त्या बाजूला फिरवू शकतो हे प्रत्यक्षात दाखविले. निवडणूकीच्या माध्यमातून पक्षाला ताकद मिळाली. त्यामुळे भटके-विमुक्त,आदिवासी, ओबीसी ; नाही रे वर्ग यांचे पक्षाकडे आकर्षण वाढले. या प्रक्रियेमुळे सत्ताधारी वर्गात भिती निर्माण झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासकालीन सांस्कृतिक  रचनेची मीमांसा करताना ब्राम्हण सोडून इतर सर्वच जाती या सांस्कृतिक दृष्ट्या एकच आहेत (सामाजिक नाही) मांडले होते आणि म्हणूनच सामाजिक स्वातत्र्याचा लढा ब्राह्मण्य झाला बदलत्या परिस्थितीत महाराष्ट्रात ब्राम्हाणाची जागा आता मराठा समाजाने घेतली आहे त्यामुळे आता सर्वजण आम्हाला सत्तेत वाटा मिळाला पाहीजे असा आग्रह मराठा समाजापुढे करताहेत. तो मिळत नसल्यामुळे हा लढा मराठा विरोधी होत आहे. त्यांच्यावाबत इतर समाजात तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे. यापुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठाच असेल, असा ज्यावेळी प्रचार करण्यात आला; त्याचवेळी मराठेतर समाज आपल्या पक्षाकडे आकर्षित होवू लागला. या. दरम्यान १९९२ साली, आम्ही किनवटची पोटनिवडणुक लढविली. पक्षाने आदिवासी उमेदवार निवडून आणला. पक्षाचे हे मोठे यश होते. पक्षाला ताकदही मिळाली. याच काळात नांदेडच्या गौतम वाघमारे यांच्या हौतात्म्यामुळे सरकारला पुन: नामांतर प्रश्‍नावर विचार करण्याची पाळी आली. त्याच वेळी मंडळ कमिशनच्या शिफारसी स्वीकारण्यात याव्या या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे ओबीसी समूह जागरूक होत होता. त्याच बरोबर मंडळ आयोगाला झालेल्या कडव्या विरोधामुळे उच्चवर्णीय हिंदू समूह आपल्या बाजूने नाहीत याचेही भान प्रथमच ओबीसींच्या समूहांना होत गेले. बाबासाहेबांनी आपल्यासाठी ही तरतूद करून ठेवली आहे ही जाणीव त्यांच्यात पसरत होती. त्याचा परिणाम म्हणजे बाबासाहेबांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. पक्षाने १९९३ मध्ये नागपूरला काढलेल्या मोर्चात पहिल्यांदा हा ओ.बी.सी. समूह फार मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. हा आंबेडकरी चळवळीतील लक्षवेधी बदल होता. पक्षाकडे आलेला हा ओ बी.सी. पाहून सरकार हादरले आणि त्याचबरोबर नामांतराचा प्रश्‍न सामंजस्यांने मिटविण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. जे नामांतर झाले त्यामध्ये आंबेडकरी समूह आणि मराठा . समाज या दोघांच्याही अस्मिता कायम ठेवून नामांतर झाले. हा तोडगा त्याही काळी मांडण्यात आला होता. परंतु त्यावेळच्या नेतृत्वामध्ये ते स्वीकारून समाजामध्ये मांडण्याची ताकद नव्हती. या नामांतराच्या चळवळीचा जो कोणी विश्लेषात्मक अभ्यास करील; त्याच्या पुढे नेहमीच कोडे राहणार आहे, की एवढे जीव आणि मालमत्ता कुर्बान का केली? अठरा वर्षे रेंगाळत असलेला नामांतराचा प्रश्‍न १९९३-१९९४ साली निकाली काढला.

                                                            रिडल्स

या पक्षाच्या नव्या. चेहच्यामुळे अनेक राजकीय समीकरणे बदलू लगली. पक्षाची ताकदही वाढली. त्याचबरोबर ही ताकद मोडून काढार्‍यासाठी अनेक राज़कीय खेळी सुरू झाल्या -त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या ‘रिडल्स इन हिंदुइझम ‘मधील ‘रिडल्स ऑफ रामा’ याच्या विरोधात फेब्रुवारी १९८७ मध्ये वातावरण पेटविण्यात आले, त्यात जातीयवादी व धर्मांध शक्तींनी पुढाकार घेतला व त्यांनी शिवसेनेसारख्या धर्मांध राजकीय पक्षाला पुढे करून हा लढा आक्रमक केला त्याचे कारण आंबेडकरी चळवळ हि अनेक वर्षांपासून एकजातीय न राहता ती वेगवेगळ्या  समदुखी समहांची चळवळ होवू पाहत होती त्यात ती यशस्यी झाली तर- आपल्या पारंपरिक सत्तेला धक्का पोहोचेल ही भिती होती डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या धर्मांतरित समूहाला कट्टरपंथी हिंदू संघटनानी मराठा समाजातला हाताशी धरून धर्मांतरित समुहाला व्यवस्थीतपणे एकाकी पाडले. त्यांना ‘धर्मबुडवे’ म्हणून संबोधले याचा परिणाम म्हणजे धर्मातरीत बौद्धांना इतरांपासून राजकीय दृष्ट्या त्यांनी एकाकी पाडले. पंरतु दुसऱ्या बाजूने त्याचा फायदा असा झाला की, धर्मतरित समुह स्वत:कडे व स्वत:च्या चळवळीकडे अंर्तमुख होवून पाहू लागला. या घटनामुळे एका बाजूला त्यानी धर्मातरीत समुहाच्या अधिकाराच्या लढाइला सुरूवात केली, आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी नव्याने निर्माण होणाच्या सामाजिक व्यवस्थेत समता आणि बंधुत्वाचे तत्व रूजविण्यासाठी प्रयत्न केला त्यांना मिळालेल्या या नव्या स्वातंत्र्यामुळे व दृष्टीमुळे त्यांनी स्वत:ला शिक्षित करून घेतले. सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश केला , आर्थिक बदलही झाला. स्वत:मध्ये आणि आपल्या नातेवाईकांमध्येही त्यांनी परिवर्तन घडवून आणले. त्यांच्यावर जी सामाजिक बंधने लादण्याचा प्रयत्न झाला; तो त्यांनी हाणून पाडला. अशा बंधनांची त्यांनी परवादेखील केली नाही. स्वतमध्ये परिवर्तन घडवून आणल्यानंतर त्यानी समदुखी समूहाचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्याला बंधनातून मुक्‍त करण्यासाठी ते धडपडू लागला. इतरांच्या प्रश्‍नावरही ते रस्त्यावर उतरले. मंडळ आयोगाची अंमलबजावणी, अत्याचारविरोधी भूमिका, विषमता विरोधी पुढाकार ही त्यातली काही ठळक उदाहरणे आहेत या प्रक्रियेतून ते ‘धर्मबुडवे’ या प्रतिमेमधून बाहेर पडले उलट ते इतरांसाठी परिवर्तनाचे एक प्रतिक बनले आहेत व सामाजिक बंधने मोडण्यात ते यशस्वी होत आहेत हे लक्षात येताच रिडल्स प्रश्‍न उपस्थित करून व्यापक होणाऱ्या त्यांच्या चळवळीला पुन्हा जातीपुरती संकुचित करण्याचा प्रयत्न झाला ही परिस्थिती निर्माण करण्यात आली. कारण त्याना माहित होते की, आंबेडकरी चळवळीतला माणूस प्रतिक्रिया देण्यामध्ये तत्पर आहे. त्यांनी प्रतिक्रिया म्हणून हिंदू देव- देवतांना शिव्या घालण्यास सुरुवात झाली की; जे हिंदू राजकीय दृष्टया आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित होत आहेत त्यांना पक्ष सोडल्याशिवाय गत्यांतर या परिस्थितीचे भान ठेवून आंदोलन हे- १) आंबेडकरी अस्मिता विरुद्ध हिंदू अस्मिता असं होणार नाही. २) हे आंदोलन लेखन स्वातंत्र्य याच मुद्यावर लढले गेले पाहिजे ३) आंदोलनाचे केंद्र हे मुंबई शहर राहिले पाहिजे ४) नामांतर आंदोलनातील त्रुटी या आंदोलनातून वगळल्या गेल्या पाहिजेत- या मुद्यांवरच लक्ष्य केंद्रीत होईल हे आम्ही जाणिवपुर्वक पाहिले व तशी काळजी घेतली. रिडल्सच्या प्रश्‍नावर वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होऊ नयेत तर एकच प्रवाह निर्माण व्हावा हा दृष्टीकोन समोर ठेवून आम्ही आंबेडकरी चळवळीतल्या सर्व संघटनांना / नेत्यांना एकत्र आणले. या सर्वाना एकत्रित आणून नामांतराच्या लढ्यातील पहिला दोष टूर करण्यात यशस्वी झालो. आम्हाला त्यांना एकत्र आणायचे होते; त्याचे कारण त्यांना मोकळे सोडले असते तर- प्रत्येकाने मीच बाबासाहेबांच्या विचाराचा ‘सच्चा पा्ईक’ आहे हे सिद्ध करण्यासाठी कडव्यातली कडवी प्रतिक्रिया देत तेहत्तीस कोटी देवांचा उद्धार केला असता. त्यांना शिव्यांची लाखोली वाहीली असती. त्यामुळे त्यांनी परिस्थिती हाताबाहेर घालविली असती. चळवळीला पोषक वातावरण निर्माण करण्याऐवजी त्यांनी त्यांच्या भाषणातून शत्रूच निर्माण केले असते. असे झाले असते तर आंबेडकरी चळवळीच्या बाहेरील समूह ज़े परिवर्तनाच्या बाजूने आहेत, त्यांची दारे चळवळीला बंद झाली असती. नामांतर आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण झाली असती. मला हे कधीच कळले नाही की, तेहत्तीस कोटी देवांना शिव्या दिल्यामुळे चळवळीचे कसे भले होणार आहे? उलट चळवळीस पोषक वातावरण निर्माण होण्याऐवजी अशा प्रतिक्रिया आणि अशा भाषणामुळे आपण शत्रूच निर्माण केलें आहेत. या सर्वाना एकत्र करून पक्षाने ठरविलेली भूमिका सर्वसमोर गेली आणि त्यामुळे-“घटनेने बहाल केलेले विचाराचे आणि लिखाणाचे स्वातंत्र्य अबाधीत राहीले पाहीजे याचवरती रिडल्सचा प्रश्‍न फिरू लागला” या भूमिकेमुळे समाजातील अनेक संघटना, विचारवंताना आपल्या बाजूने येण्यास पोषक वातावरण निर्माण झाले.

 त्यामुळे आंबेडकरी चळवळी शिवाय इतरही “लेखन स्वातंत्रय अबाधित राहिले पाहिजे’ ही भूमिका घेणाऱ्यांना आपल्याबरोबर यायला काहीच अडचण राहीली नाही. त्यांच्या पाठिंबा आणि सहभागामुळे महाराष्ट्र शासनाला ‘रिडल्स’ जसेच्या तसे प्रकाशित करावे लागले. येथे दोन गोष्टीचे स्मरण आपणास करून देवू इच्छितो: आंबेडकरी चळवळीतील प्रस्थापित नेते त्यावेळी इतरांपेक्षा मी कसा लायक आहे हे सिद्ध करण्यासाठी कटिबद्ध झाले होते. ते नेतृत्वासाठी भांडत होते. त्यावेळचा ‘नवाकाळ’ नजरेखालून घातला तरी ही परिस्थिती आपल्या लक्षात येईल. त्याचा एक फायदा, आम्हाला असा झाला की, हे नेतृत्वासाठी भांडत राहिल्यामुळे रिडल्डसचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य मिळाळे त्यामुळे जी उद्दिष्ट्ये समोर ठेवून लढा उभा केला, त्याच प्रश्‍नावरती रिडल्सची चळवळ केंद्रीत करण्यात यश आले त्यात ज्या दक्षता घ्यायच्या त्या घेता आल्या. त्यापैकी सर्वात महत्वाची दक्षता म्हणजे “कुठल्याही परिस्थितीत हा लढा आंबेडकरी अस्मिता विरूद्ध हिंदू अस्मिता असा होवू द्यायचा नाही” त्यात आम्ही यशस्वी झालो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा लढा शांततेने लढायचा. दंगल करून नव्हे. हा आंबेडकरी चळवळीचा संदेश लोकांना द्यायचा होता, तो दिला बाळ ठाकरे यांनी मुंबइत त्यावेळी मोठा मोर्चा त्यावेळी ‘मोठा’ मोर्चा काढून दलितांची घरे जाळा असा तो आदेश दिला होता; त्यावेळच्या परिस्थितीचे भान ठेवून मुंबईत बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या घरातल्या चुली पेटवू या’ असे आवाहन मी केले होते त्यातून ठाकरेंची फजिती झाली आणि समयसूचकतेतुन प्रश्न सुटायला मदत झाली. त्यामुळे सरकारने पुन्हा रिडल्स इन हिंदूइझम प्रकाशित केले. नामांतराचा लढा हा मराठा अस्मिता विरूद्ध आंबेडकरी अस्मिता असा होता. परंतु हा रिडल्सचा लढा हा हिंदू अस्मिता विरूद्ध आंबेडकरी अस्मिता एवढा व्यापक होता तरीही कुठेही दंगल आणि रक्‍तपात न होता तो प्रश्‍न सोडविण्यात यशस्वी झालो.
‘येरे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे एकत्र आलेले नेते आणि संघटना आंबेडकरी चळवळीचे स्वत:चे स्वतंत्र राजकारण करण्यापेक्षा पुन्हा कुणाच्या ना कुणाच्या ओंजळीने पाणी पिण्याच्या राजकारणात गर्क झाले ते आपआपल्या राजकीय मित्रांबरोबर समझोता करत फिरत राहीले नेते जरी वेगवेगळे राहिले तरी रिडल्समुळे एकत्र आलेल्या जनसमूहाची ताकद पक्षाबरोबर राहिली. त्या भरवशावर पक्षाने स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *