बाबासाहेब धम्मदीक्षा सोहळ्यासाठी नागपूर एयरपोर्ट वर आले आणि….

आठवणी

दि. ९-१०-१९५६ ची सकाळ दररोज च्या प्रमाणे उगवली होती. कामाची घाईगर्दी चालूच होती, या दिवशी एक उल्लेखनीय घटना घडली सकाळच्या वेळी, मिलिंद महाविद्यालयाचे रजिस्टार श्री. व्हराळे, भारतीय बौद्धजन समितीच्या कोठारी भवनमधील ऑफिस मध्ये  वामनराव समोर उभे राहिले वामराव कामात व्यस्थ होते. एकेक काम हातावेगळे कसे करता येईल इकडेच लक्ष अखेर श्री व्हराळे यांनी वामनरावास एकीकडे बोलावून सांगितले

“आपण विमानतळावर जाऊ या ”

वामनराव – “कशाला ? मला बनवू नकोस ”

पुढे श्री व्हराळे म्हणाले,,

“जो पर्यंत तुझी इकडली व्यवस्था ठीक आहे हे मी बाबासाहेबांना कालविणार नाही तोवर बाबासाहेब येणार नाही तेव्हा ज्या मार्गाने बाबासाहेबांना आणायचे ठरले आहे त्याच मार्गाने आता आपण विमानतळावर जाऊ या. ”

वामनरावांनी कोठार भवनातून हल्लीच्या आनंद टॉकीज समोर असलेल्या नॉर्मलस्कूल क्वाटर्स समोरून धंतोली कडे जाणारा रस्ता, मेहाडीया चौकात जातो. तिथून वर्धा रोड़ला पंचशील टॉकीज जवळ मिळतो, तिथून थेट वर्धा मार्गे विमानतळ गाठले बाबासाहेब  मध्ये थांबणार त्यांना घेऊन येणारी गाडी त्यांचा ड्रायव्हर, अशी सारी बारीक सारीक माहिती वामनरावांनी सविस्तर निवेदन केली. श्री व्हराळे रजिस्ट्रार यांना व्यवस्था पाहून, समाधान झाले, रात्री त्यांनी बाबासाहेबांना ट्रंक कॉल करण्यात आला, हा फोने नागपूर च्या शाम हॉटेल मधून करण्यात आला.

वसंत टॉकीजच्या वरच्या आणि शाम हॉटेल मधील काही खोल्या निवासाकरता निश्चित करण्यात आल्या कोणाला कोणत्या रूम मध्ये  ठेवायचं हे सुद्धा ठरवलं गेलं. बाबासाहेबांच्या खोलीलगत रजिस्ट्रार श्री व्हराळे यांची खोली नंतर भदंत चंद्रमणी महास्थवीरांची खोली, महाबोधी सोसायटीचे सर चिटणीस देवप्रिय वलणी सिन्हा यांची खोली, यशवंतराव आंबेडकर यांनाही येथेच उतरविण्याचे ठरले . धम्मदीक्षा सोहळ्यात बाबासाहेब आणि माईसाहेब हॉटेल श्‍याममधील ११६ क्रमांकाच्या खोलीत थांबले होते. भन्ते महास्थवीर चंद्रमणी ११८ क्रमांकाच्या खोलीत थांबले. यानंतर भन्ते संघरत्न, भन्ते प्रज्ञानंद, भन्ते सदतिस्स, भन्ते पय्यातिस्स येथे आले होते. बाबासाहेबांचे अतिशय जवळचे नानकचंद रत्तू ११९ क्रमांकाच्या खोलीत थांबले होते. याशिवाय बाबासाहेबांचे संगीत शिक्षक भालचंद्र पेंढारकर, देवप्रियवली सिन्हा, वराळे गुरुजी, बाळू कबीर आदी सारी मंडळी याच हॉटेलमध्ये थांबली होती.

ऑक्टोबर महिन्याचा दहावा दिवस उगवला (१०-१०-१९५६) अतिशय प्रसन्न, अति-धावपळ. वेगळ्याच आनंदाने आणि उत्साहाने भारावलेली, सुख दुसर्यास सांगितले कि दुणावतो. सकाळी ९ च्या सुमारास समितीच्या ऑफिस  समोरच्या उभ्या असणाऱ्या मोटारी चालू झाल्या. आकांत माटे ,पं. रेवारामजी कवाडे , दशरथ पाटील, सदानंद फुलझेले,व्हराळे ,वामनराव हि सारी मंडळी निघाली, मोदी नं. ३ मधून जाणाऱ्या रस्त्यावरील फुलाच्या दुकानासमोर मोटारी थांबल्या २ हार घेण्यात आले. तेव्हा कुहे सदानंद फुलझेले च्या लक्ष्यात आले कि नक्कीच बाबासाहेब आज येणार आहेत. आकांत माटे यांनी मोटारी हरदास आवळे ह्यांच्या घराकडे वळवण्याचे सांगितलें तेवड्यात वामनराव म्हणाले “विमान वेळेवर येणार आहे ते येतील . आपल्यास तेथे लवकर पोहचले पाहिजे , मी त्यांना बोलावले आहे ते आले नाहीत ह्यात माझा दोष नाही” 

विमान अगदी दहा वाजायला दहा मिनिटे असतानाच जमिनीला लागले. शिडीवरून उतरणे बाबासाहेबांना शक्य नसल्या मुळे आधी सगळ्या प्रवास्यांना उतरू दिले सगळे उतरल्यावर शिडी बाजूला काढून बाबासाहेब आणि माईसाहेब करिता स्पेशल ट्रॉली लावण्यात आली त्यात ते बसून विमानतळाच्या फाटका पर्यंत गेले, फाटकाजवळ आकांत माटे ,पं. रेवारामजी कवाडे , दशरथ पाटील, सदानंद फुलझेले,व्हराळे ,वामनराव  इत्यादी लोक उभे होते तेवढ्यातच बाबासाहे आणि माईसाहेब यांच्या गळ्यात दशरथ पाटील आणि वामनराव ह्यांनी स्वागत केले.बाबासाहेब आणि माई साहेब यांच्या साठी स्पेशल (विशेष) मोटारगाडी होती त्यात ड्रायव्हर,नानकचंद रत्तू, बाबासाहेब आणि माईसाहेब फक्त ४ व्यक्ती होते, गाळीत बसण्या अगोदर डोक्यावर फरकॅप (थंडीत घालण्याची टोपी ) घातली आणि मोटारीत बसले. बहुतेक कोणी त्यानासहज सहज ओडखु नये त्यामुळे त्यांनी तस केलं असावं. 

पुढील भाग लवकरच प्रकाशित करन्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *