जाणून घ्या बाबासाहेब विद्यार्थ्यांना मार्क्स कसे द्यायचे…

आठवणी

मुंबई येथील सिडनहॅम कॉलजमध्ये एका प्राध्यापकाची जागा रिकामी झाली. आंबेडकरांना आर्थिक दृष्ट्या अजूनही चांगली झाली नव्हती. त्या मुले त्यांनी या जागेसाठी दि. ५-१२-१९१७ रोजी अर्ज पाठविला त्या जायची बाबासाहेबाना सोबत अजून १० अर्ज आलेली होती. त्या अकरा उमेदवारांत आर.एम.जोशी यांना नेमावे असे प्राचार्य ऑनष्थी यांचे मत होते . परंतु त्यांनी इंग्लंड वरून जेव्हा प्रा. ऍड्व्हीन कॅनन यांचे मत विचारले तेव्हा कॅनन म्हणाले “विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी आंबेडकर आपल्या जवळची सर्व सामग्री त्यांच्यासमोर ओततील” अधिकाऱ्यांनीदेखील त्यांच्या अर्जावर लिहिले कि, आंबेडकरांनी जे ज्ञान संपादन केले ते ‘महार’ असून त्यांनी मिळवले यावरून त्यांच्यात असाधारण गुण असावेत हे उघड आहे. त्यांची वागणूक सभ्य व व्यक्तिमत्व प्रसन्न आहे सिडनहॅम कॉलेज मध्ये पॉलिटिकल इकॉनॉमी (राजकीय अर्थशात्र ) या विषयाचा प्राध्यापक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आली. डॉ आंबेडकरांनी १० नोव्हेंबर १९१८ पशु ४५०/-रु. प्रति माह पगारावर तात्पुरत्या पदावर एक वर्ष करिता सरकारने नेमणूक केली. 

आंबेडकर अस्पृश्य आहेत हे कळताच पहिल्या प्रथम विद्यार्थी त्यांच्या वर्गात फारसा रस घेत नसत. परंतु त्यांच्या शिकवण्याच्या शैलीची जस-जशी ख्याती पसरू लागली तस-तशी विद्यार्थ्यांची रीघ त्यांच्या वर्गात वाढू लागली आंबेडकरांचा सखोल अभ्यास,सर्वांगीण विवेचन आणि विचारप्रवर्तक स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना खिळवून ठेऊ लागले. अन्य अनेक कॉलेजचे विद्यार्थी आंबेडकरांची परवानगी घेऊन त्यांच्या वर्गात त्यांचे व्याख्यान ऐकण्यास बसू लागले. आंबेडकर लवकरच आपल्या शिकवण्याच्या शैलीमुळे विद्यार्थ्यात लोकप्रिय झालेत. डॉ आंबेडकर यांच्या दृष्टीने आधुनिक परीक्षा पद्धती योग्य नाही. विद्यार्थी वर्गात काय शिकतो या वर त्याचे मूल्य-मापन व्हायला हवे, तोंडी परीक्षेला लेखी परीक्षे पैकी अधिक जास्त महत्व द्यायला हवे. रामचंद्र बनौला या आंबेडकर चरित्राच्या लेखकाने जेव्हा डॉ आंबेडकरांना ते परीक्षक म्हणून कसे कार्य करतात याबद्दल विचारणा केली तेव्हा ते म्हणाले,

“उत्तर पत्रिका माझे स्वतःचे काही निकष आहेत. मी ५० टक्के मार्क उत्तरातील व ५० टक्के उत्तराच्या रितीसाठी राखून ठेवतो. रीतीमध्ये भाषा, शैली, व मांडण्याची पद्धती यांचा समावेश होतो. शक्यतो प्रत्येक विद्यार्थ्यास पास करणे हा माझा हेतू असतो. अर्थात साधरणपणे जास्तीत जास्त उत्तर-पत्रिकांना ३३ टक्के मार्क देण्यात येतात. ज्या उत्तर-पत्रिका ३३ टक्के मार्क दिल्यांनतर चांगली वाटल्या त्यांना ४५ टक्क्यापर्यंत मिळत. मात्र त्यांनतर मात्र फार कडक तपासणी करण्यात येई. साठ टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी फारच थोडे असत. कारण अशा उत्तर-पत्रिका फारच कडकपणे तपासल्या जात. “
बनौधाने पुन्हा विचारले,” काय आपण ६० टक्के पेक्षा कुणाला जास्त मार्क दिले नाहीत ?”
या प्रश्नाने बाबासाहेबाना एक जुनी घटना आठवली, ते गंभीर होऊन म्हणाले,
जे ६० टक्के गुण मिळवण्यास लायक होते अशाच विद्यार्र्थ्याना मी ६० टक्क्याच्यावर दिलेले आहेत. एकदा मी एका विद्यार्थ्यास १५० पैकी १४४ गुण दिलेले आहेत. त्या विदयार्थ्यांची उत्तरे इतकी उत्तम व खुबीने लिहलेली होती कि त्याला पूर्ण दीडशे गुण द्यावे असे वाटत होते. परंतु हा काही गणिताचा पेपर नव्हता सबब सहा मार्क कमी दिले. 
“ती उत्तर-पत्रिका जेव्हा मी डिग्री कॉलेज च्या अधिकाऱ्याना परत केली तेव्हा त्या अधिकाऱ्यांना असे वाटले कि हा विद्यार्थी कॉलेज चा असून त्याला पहिला क्रमांक व पदक मिळण्याचा संभव आहे. तेव्हा ती उत्तर-पत्रिका त्यांनी पुन्हा तपासण्यासाठी माझ्याकडे पाठवली. तेव्हा मी ती उत्तर-पत्रिका जशीच्या तशी परत केली व हाच माझा अंतिम निर्यय आहे असे त्यांना कळविले. त्यांनतर त्यांनी ती उत्तर-पत्रिका दुसऱ्या परीक्षकाकडे पाठविली. काहींनी त्या विद्यार्थ्यास १४४ पेक्षा कमी गुण दिले. काहींनी त्या पेक्षा जास्त गुण दिले. शेवट त्या अधिकाऱ्यांना नाईलाजाने माझाच निर्णय मान्य करावा लागला. “
“आपणाकडे कुणी विद्यार्थ्यांची शिफारस घेऊन आले होते ?”
डॉ आंबेडकर गंभीर होऊन म्हणाले,”होय, एकदा एका अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या नातलगांस असा पत्ता लागला कि मी मुंबई विद्यापीठाचा परीक्षक आहे. तो माझ्या कडे आला आणि त्या विद्यार्थ्यास पास करण्याचा गळ घालू लागला. तो विद्यार्थी अस्पृश्य आहे म्हणून मी त्याला मदत करील असे त्याला वाटले. परंतु हे असंभाव्य होते. मी त्याला स्पष्ट बजावले कि, “मी मनात आणले तरी हे शक्य नाही, परंतु मला हे शोभत नाही, दुसरे असे कि मला अशा प्रकारे कुणाची शिफारस माझ्याकडे आणणे मला तिरस्कार वाटते. अस्पृश्य विद्यार्थी अन्य विद्यार्थापेक्षा बुद्धिमतेत आन कर्तृत्वाट कमी प्रतीचा ठराव असे वर्तन त्याच्याकडून घडू नये असे मला वाटते. इतरांच्या तुलनेत तोही आदर्श विद्यार्थी निपजावा असे मला वाटते.” 
हे उत्तर एकूण ते गृहस्थ गुपचूप निघून गेले. 
– संदर्भ:- डॉ बाबासाहेब आंबेडकर,लेखन आणि भाषणे, खंड १,१९७९. पृष्ठ क्र . ४८१-४९२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *